सप्तपदी न होता, निकाह न वाचताच करीना कशी झाली सैफची बेगम

तिचं आणि सैफचं नातं नेमकं कोणत्या बळावर उभं आहे हे?   

Updated: Oct 26, 2021, 02:47 PM IST
सप्तपदी न होता, निकाह न वाचताच करीना कशी झाली सैफची बेगम
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान हिला हिंदी चित्रपटसृष्टीत बेगम म्हणून ओळखलं जातं. करीनानं अभिनेता सैफ अली खान याच्याशी विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. वैवाहिक नात्याची सुरुवात करत करीन आणि सैफनं सर्वांपुढेच एक नवा पायंडा पाडला होता. 

करीना आणि सैफ या दोघांचेही धर्म वेगवेगळे. त्यामुळं त्यांचं लग्न नेमकं कोणत्या पद्धतीनं पार पडलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. 

सोशल मीडियावर सहसा अनेक सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्यांचे लक्ष वेधणारे फोटो पाहायला मिळतात. पण, करीना आणि सैफचे लग्नाच्या दिवसाचे क्वचितच फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

सैफ आणि करीनाचं लग्न हे दोन विविध धर्माच्या व्यक्ती विवाहबंधनात अडकत असतील त्यांच्यासाठी आदर्श ठरलं. 

बॉलिवूडमधील या दोन्ही सेलिब्रिटींनी धर्माच्या वाटांवर न जाता वेगळ्याच पद्धतीन लग्न रचलं होतं. 

सप्तपदी न घेता आणि निकाह न वाचता कोर्ट मॅरेज पद्धतीनं करीना आणि सैफने लग्न केलं होतं. ज्यानंतर त्यांनी अंगठ्या एकमेकांना दिल्या होत्या. या लग्नानंतर दोघांनीही जंगी पार्टी सर्वांनाच दिली होती. 

करीनाचा खूप चांगला मित्र, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं ही माहिती दिली होती. 

कोणीही धर्मपरिवर्तन न करता केलेल्या या लग्नामुळं रणधीर कपूर यांनीही आनंद व्यक्त केला होता. खऱ्या अर्थानं दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी लग्न केलं अशीच भावना त्यांनी व्यक्त केली होती.