ज्या चाळीत लहानाचे मोठे तेथे अचानक पोहोचले जॅकी श्रॉफ, मानेवर रुमाल ठेवण्याचे रहस्यही उलगडले

jackie shroff neck scarf​ : ज्यांनी अनेक वर्ष चाळीत वास्तव्य केले आहे त्यांच्यासाठी सर्वाधिक खास गोष्ट कोणती असेल असं त्यांना विचारलं तर त्यांना एक काही सांगता येईल असं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हे तर खरं असतं की त्यांच्या या आठवणी जाणं काही सोप्पं नाही. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्यानंही आपल्या चाळीतल्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 19, 2023, 07:18 PM IST
ज्या चाळीत लहानाचे मोठे तेथे अचानक पोहोचले जॅकी श्रॉफ, मानेवर रुमाल ठेवण्याचे रहस्यही उलगडले title=
jackie shroff visits his old chawl where he lived for 33 years

Jackie Shroff : प्रत्येकाला आपल्या चाळीतील आठवणी फारच खास वाटतातच वाटतात. आपलं संपुर्ण बालपण हे त्या चाळीतील गेलेलं असतं. त्यामुळे ही जागा आपल्यासाठी फारच खास असते. त्यातून नाना तऱ्हेची माणसं आपल्याशी जोडलेली असतात आणि त्यांच्या आठवणी या आपण कधीच विसरू शकत नाही. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यासाठीही देखील तिच्या चाळीच्या आठवणी फार खास आहे. त्यातील दोन उदाहरणं आपल्याला माहितीच आहेत आणि ती म्हणजे जॅकी श्रॉफ आणि जितेंद्रही.

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या जुन्या चाळीला नुकतीच भेट दिली आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या बाबतीत खुलासा केला आहे. ज्या चाळीत ते 33 वर्षे राहिले आणि लहानाचे मोठे झाले त्या चाळीला त्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यांनी यावेळी आपल्या या चाळीतल्या अनेक इमोशनल गोष्टी शेअर केल्या आहेत. 

हेही वाचा : भाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष

यावेळी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ''मी नुकतीच त्या चाळीला भेट दिली. तिथे 89 वर्षीय आजीचा वाढदिवस साजरा केला आणि माझे जुने मित्र आणि इतर लोकांना भेटलो. मी माझ्या आयुष्यातील 33 वर्षे तिथे घालवली आहेत. त्यामुळे त्या चाळीचं माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल.'' असं ते यावेळी म्हणाले. खरंतर अभिनेता हा कितीही मोठा झाला तरीसुद्धा त्यांच्यासाठी आपलं बालपण आणि आपल्या बालपणात जोडलेली माणसं, जागा या तो कधीही विसरत नाही, हाच मोठेपणा हा जॅकी श्रॉफ यांचाही आहे. तेव्हा त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या यावेळीही त्यांची याचमुळे जोरात चर्चा रंगलेली आहे. 

जॅकी श्रॉफ हे मानेला रूमाल लावतात ही त्यांची स्टाईल आपल्याला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे याच मुलाखतीत त्यांनी याविषयीही खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ''मी जेव्हा माझ्या आईची साडी अशाप्रकारे पकडायचो तेव्हा मला फारच छान वाटायचे, मला शांती मिळायची. त्यामुळे मग मला अशा मुलायम कपड्यांची सवय झाली आणि म्हणून मी मानेला रूमाल घेऊन फिरतो'', असं आठवण त्यांनी मला सांगितली. ते पुढे असं म्हणाले की, 'मला बांधणी फार आवडतं. माझ्या रंगीला या चित्रपटातही मी याचा वापर केला आहे. शेवटी मीही देव साहेब यांचा फॅन आहे'' जॅकी श्रॉफ आता लवकरच बाप या चित्रपटातून दिसणार आहेत.