किन्नरसोबत डान्स करताना दिसली जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्ड आणि स्टाईलिश अंदाजासाठी ओळखली जाते. 

Updated: Sep 25, 2021, 11:15 AM IST
किन्नरसोबत डान्स करताना दिसली जॅकलिन फर्नांडिस

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्ड आणि स्टाईलिश अंदाजासाठी ओळखली जाते. तिच्या सिनेमातील ग्लॅमरस अंदाज सगळ्यांचच लक्षवेधून घेणारा असतो. पण सध्या जॅकलिन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलिनने काही दिवसापूर्वी किन्नर समाजाच्या एका ट्रस्टला भेट दिली. या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अनेक मोठ्या गणेश मंडळात दर्शन घेण्याऐवजी जॅकलिनने किन्नर समाजाच्या उत्सवात सामील होणं जास्त पसंत केलं. जॅकलिनने स्वतः सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. जॅकलिनने शेअर केलेले फोटो किन्नर समाजाच्या गणपती पंडालचे आहे. जॅकलिन फर्नांडिसच्या या पोस्टवर तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

जॅकलिन फर्नांडिस यावेळी इतर किन्नरसोबत डान्स करताना देखील दिसली. त्यांच्यासोबत वेळ घालवत जॅकलिनने सण साजरा केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री अलीकडेच 'भूल पोलिस' चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात यामी गौतम, अर्जुन कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.