जॅकलीन या महाठगाला करतेय डेट; वकिलांचा दावा

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन वादाच्या भोवऱ्यात

Updated: Oct 24, 2021, 12:13 PM IST
जॅकलीन या महाठगाला करतेय डेट; वकिलांचा दावा

मुंबई : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुमारे 7 तास चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिहार जेलमधील महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला एक महागडी कार भेट दिली होती. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सुकेश चंद्रशेखर यांचे वकील अनंत मलिक यांनी दावा केला आहे की, जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर एकमेकांना डेट करत होते.

शनिवारी मीडियाशी बोलताना वकिलाने दावा केला की, 'जॅकलीन आणि सुकेश एकमेकांना डेट करत होते. विश्वसनीयस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगू शकतो'. दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले असून, 'जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले आहे. तिने तिचे म्हणणे नोंदवले आहे आणि भविष्यातही तपासात एजन्सीला पूर्ण सहकार्य करेल.'

यावेळी सुकेश आणि त्याच्या पत्नीसोबतच्या संबंधांबद्दल केलेल्या कथित निंदनीय विधानांचे जॅकलिनने खंडन केले. सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉलसोबत तिचे कोणतेही संबंध नाहीत आणि कोणाला डेट करत नसल्याचे जॅकलिनने स्पष्ट केले. या प्रकरणात नोरा फतेहीचेही नाव आले, त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने तिचीही चौकशी केली.

सुकेशला लीना पॉलला बॉलिवूडमध्ये आणायचं होतं
सुकेश चंद्रशेखरनेही अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी बोलून पत्नीला बॉलिवूडमध्ये आणलं. या निर्मात्याला आणि दिग्दर्शकांना पैशाचं कोणतेही टेन्शन घेऊ नका असंही सांगितलं होतं. तिहार जेलमध्ये आरामात राहण्यासाठी सुकेशने करोडो रुपये खर्च केले होते. आता सुकेश आणि त्याची पत्नी लीना ईडी रिमांडमध्ये आहेत.

सुकेश चंद्रशेखर आणि लीना पॉल जेलमध्ये 
सुकेश चंद्रशेखरला पोलिसांनी या वर्षी 2021 मध्ये अटक केली आहे. सुकेशवर तुरुंगात बसून 200 कोटींच्या वसुलीचे मोठं रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. सुकेशने कारागृहातून एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाच्या पत्नीकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण समजून घेऊन पोलिसांनी जेव्हा तुरुंगावर छापा टाकला तेव्हा त्यांना सुकेशच्या सेलमधून 2 मोबाईल फोनही मिळाले. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही तुरुंगात आहे.