बॉलिवूड अभिनेत्रीमुळे गरीब महिलेचं मोठं नुकसान...भर रस्त्यात अशी केली भरपाई

त्यामुळे जॅकलिनचं वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत आलं होतं. 

Updated: Mar 22, 2022, 04:52 PM IST
 बॉलिवूड अभिनेत्रीमुळे गरीब महिलेचं मोठं नुकसान...भर रस्त्यात अशी केली भरपाई title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत जोडलं जात आहे.

पण दोघांकडून त्यांच्या नात्याबाबत कोणीतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जॅकलिन आणि सुकेशचे खाजगी फोटो देखील व्हायरल होऊ लागले होते. त्यामुळे जॅकलिनचं वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत आलं होतं. 

आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रेस्टॉरंटच्या बाहेरचा आहे. व्हिडिओमध्ये काही गरीब मुलांना पाहून अभिनेत्री जे करते, त्यामुळे तिची खूपच चर्चा होत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा हा व्हिडिओ रात्री उशिराचा आहे. जेव्हा ती एका हॉटेलमधून डिनरनंतर बाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्री तिच्या मित्रासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडते.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जॅकलिन फर्नांडिस रेस्टॉरंटमधून बाहेर येताच तिला गरीब मुलांनी घेरले. तिच्याकडे काहीतरी खायला देण्याची मागणी केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर अभिनेत्री  गाडीच्या दिशेने जाऊ लागली, तेवढ्यात एक गरीब महिला म्हणाली- "तुम्हाला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी गडबडीत आमचे फुगे फोडले, आमचे 100 फुगे फुटले आहेत."

गरीब महिलेचं बोलणं ऐकल्यानंतर अभिनेत्री कशीबशी गाडीपर्यंत पोहोचली आणि तिने बॅगेतून पैसे काढून महिलेला दिले.