Walmik Karad Health: पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकनं तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगं केली. बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभरात जेवणच केलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढचे चौदा दिवस कोठडीतून सुटका नसल्यानं आता वाल्मिक कोठडीतून बाहेर पडण्यासाठी चोरवाटा शोधू लागलाय. आजारी असल्याचं सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी वाल्मिक आता धडपड करु लागल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं काही सोंगं घेतल्याचा दावाही करण्यात येऊ लागलाय.
तुरुंगातील पहिल्या रात्री वाल्मिक कराडनं जेवण केलं नाही. सकाळी नाश्ता करण्यासही वाल्मिकनं नकार दिला. पोलिसांच्या आग्रहानंतर वाल्मिकनं आर्धी पोळी खाल्ली. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यानं वाल्मिकवर औषधोपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला तात्पुरतं ऑक्सिजन कीट लावण्यात आलंय. आजारी पडल्यास वाल्मिकला कोठडीऐवजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण आजारी कसे पडू यासाठी वाल्मिकची धडपड सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. तब्येत ढासळल्यास रुग्णालयात जायला मिळेल आणि चौकशीपासून लांब पळता येईल यासाठी सगळं काही सुरु असल्याचा आरोप होतोय.
आजारी आरोपीची चौकशी करताना तपास अधिकारीही काहीसे सौम्य वागतात. शिवाय चौकशीचे कठोर उपायही करण्यात मर्यादा येतात. चौकशी होऊच द्यायची नाही यासाठी वाल्मिकनं आजारपणाचा फंडा निवडला असावा असं सांगण्यात येतंय. सीआयडी कोठडीत चौकशीचे खास ठेवणीतले उपाय केले जातात. तो प्रयोग होऊ नये म्हणून वाल्मिक आधीच आजारी पडल्याचं सोंग घेऊ शकतो...वाल्मिकला बीपी आणि डायबिटीज आहे. त्यामुळं तपासअधिकारी अधिक कठोर वागणार नाही असं वाल्मिकला वाटू शकतं.
सीआयडीकडं येणारी प्रकरणी साधीसुधी नसतात. त्यामुळं त्यांच्या कोठडीतले आरोपी कुख्यात असे असतात. त्यामुळं ही वाल्मिकची ही नाटकं त्यांच्यासमोर चालण्याची शक्यता फारच कमी आहे. संतोष देशमुखांच्या खुनानंतर देशभर मोकाट पळालेल्या वाल्मिकचा आजार सीआयडीवाले व्यवस्थित बरा करतील अशी अपेक्षा आहे.