Big Breaking : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा

संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरुन त्याला अटक करण्यात आली. 

वनिता कांबळे | Updated: Jan 1, 2025, 04:57 PM IST
Big Breaking : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा  title=

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. क्रीडा विभागात 21 कोटी घोटाळा प्रकरणात हर्षकुमार क्षीरसागर 11 दिवसापासून फरार होता.  हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरला पोलिसांनी अटक केलीय. तिची चौकशीही कऱण्यात आलीय. आतापर्यंत चार आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. हर्षकुमार क्षीरसागर याच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. हर्षकुमार क्षीरसागर याला दिल्लीतून ताब्यात घेतले.  निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून  पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हर्षकुमार क्षीरसागर याच्या आई-वडीलांना कर्नाटकच्या मुरुडेश्वर मधून ताब्यात घेण्यात आले आहे.

हर्षकुमार क्षीरसागर संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरतहोता.  याचा पगार आहे फक्त 13 हजार. पण त्यानं  तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये कमावले.  हर्षकुमार क्षीरसागर  वर्षभरातच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये आपल्या 2 बँक खात्यांवर वळते केले. नंतर ते  तब्बल 15 पेक्षा जास्त खात्यावर वळवून खर्च केले. यासाठी त्यांन यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याचीही मदत घेतली. वर्षभरानंतर हर्षकुमारचं हे गौडबंगाल उजेडात आलं. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर तो फरारा झाला.

हर्षकुमार क्षीरसागरकडे सापडलेली संपत्ती

1.35 कोटींची बीएमडब्ल्यू कार
-1.20 कोटी रुपयांचे वडिलांचे 4 फ्लॅट
-1 कोटी खर्च करून घरात इंटिरियरचं काम
-बँक खात्यात 3 कोटींची रक्कम
-चीनमधून 50 लाखांची खरेदी
-40 लाखांच्या 2 स्कोडा कार
-32 लाखांची बीएमडब्ल्यू बाईक
तर दुसरीकडे हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरकडेही कोट्यवधींची संपत्ती सापडलीय 
संभाजीनगरच्या चिखलठाण्यात 1.35 कोटींचा फ्लॅट
- मुंबईत 1.05 कोटींचा फ्लॅट
- 1.44 लाखांचा आयफोन
-15 लाखांची स्कोडा गाडी
- 1.09 लाखांचा स्मार्टफोन
- 3 बँका खात्यात 1 कोटी 1 लाख रुपये