जॅकलिन फर्नांडिस कॉस्मेटिक सर्जरीमुळे ट्रोल; व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का

अभिनयासोबतच जॅकलिनने तिच्या सुंदर लूकनेही लोकांना वेड लावलं आहे. 

Updated: Dec 7, 2022, 11:53 PM IST
जॅकलिन फर्नांडिस कॉस्मेटिक सर्जरीमुळे ट्रोल; व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोईंग देखील खूप मजबूत आहे.  'अलादीन' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जॅकलीन फर्नांडीस हे आज खूप मोठं नाव बनलं आहे. जॅकलीन शेवटची सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटात दिसली होती.

अभिनयासोबतच जॅकलिनने तिच्या सुंदर लूकनेही लोकांना वेड लावलं आहे. नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे  फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या जॅकलिनचा असा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यानंतर तिला ट्रोल व्हावं लागत आहे.

या कारणामुळे जॅकलीन ट्रोल होत आहे
या व्हिडिओमध्ये जॅकलीन फर्नांडिस  नॅच्यूरल ब्यूटीचं समर्थन करताना दिसत आहे आणि कॉस्मेटिक सर्जरीला चुकीचं म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये ती कॉस्मेटिक सर्जरी सौंदर्य स्पर्धांच्या विरोधात असल्याचं सांगत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं कॉस्मेटिक सर्जरीसाठी अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.

जॅकलीनने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2006 मध्ये तिने मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताबही जिंकला होता. त्याचवेळचा तिचा सौंदर्य स्पर्धेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती कॉस्मेटिक सर्जरीबद्दल बोलत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स जॅकलिनला ट्रोल करत आहेत.

एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, "मग तू सौंदर्य स्पर्धेत मेकअप का केलास, तू नॅचरल ब्यूटी झाली असतीस." तर दुसर्‍या एका युजर्सने  कमेंट केली की, "मग तू सर्जरी का केलीस." आणखी एका यूजरने लिहिलं की, "आणि आता तिने तिच्या शरीरावर सगळ्या प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी केली आहे, तिचा चेहरा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही." असा कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्रीला युजर्सनी ट्रोल केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॅकलीन फर्नांडिसने रितेश देशमुखसोबत अलादीन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण या चित्रपटांमधून तिला फारशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर जॅकलीन इम्रान हाश्मीसोबत मर्डर 2 चित्रपटात काम करताना दिसली आणि त्यानंतर जॅकलीन फर्नांडिस रातोरात स्टार झाली. कारण त्या चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय केला होता आणि त्यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.