मुंबई : 'जमाई राजा' फेम टेलिव्हिजन अभिनेत्री सारा आफरिन खान आई बनली आहे. साराने दोन जुडवा मुलांना यूकेमध्ये जन्म दिला आहे. साराने हिप्नोबर्थिंगच्या मदतीने मुलांना जन्म दिला. साराच्या योगा ट्रेनरने याबाबतची माहिती दिली.
साराची योगा ट्रेनर जेन यांनी सोशल मीडियावरुन साराच्या प्रेग्नंसीबाबत माहिती दिली. साराने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुडवांना जन्म दिला. तिने मुलाचं नाव झिदेन आणि मुलीचं नाव अलीझा असं ठेवलं आहे.
सारा लग्नानंतर तिच्या पतिसोबत यूकेमध्ये राहत आहे. साराचे पती प्रसिद्द मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. २००९ मध्ये सारा लग्नबंधनात अडकली.
सारा आफरिन खानने रवि दुबे आणि निया शर्मा यांच्यासोबत 'जमाई राजा' या मालिकेत काम केलं आहे. मात्र 'ढूंढ लेगी मंजिल हमें' या मालिकेत अल्का तिवारीच्या भूमिकेतून सारा प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय तिने 'लव्ह का है इन्तजार' या मालिकेतूनही काम केलं आहे.