श्रीदेवीची साडी नेसून 'नॅशनल अॅवॉर्ड'साठी पोहोचली जान्हवी

 जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली.

Updated: May 4, 2018, 09:42 AM IST
श्रीदेवीची साडी नेसून 'नॅशनल अॅवॉर्ड'साठी पोहोचली जान्हवी  title=

मुंबई : 'मॉम' सिनेमासाठी श्रीदेवीला मरणोत्तर बेस्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. पुरस्कार घेण्यासाठी मुलगी जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली.तिच्यासोबत लहान बहीण खुशी कपूर आणि पप्पा बोनी कपूरदेखील होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला. तिने नेसलेल्या पिंक कलरच्या साडीला पिंक बॉर्डर आहे. झुमके आणि टिकलीसोबत जान्हवी सुंदर दिसत होती. 

 

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on

'आम्ही तिला मिस करतोय'

 पुरस्कार सोहळा सुरू होण्याआधी बोनी कपूर यांनी डीडी न्यूजला सांगितले, 'सिनेमा, टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून श्रीदेवी सर्वांच मनोरंजन करत राहील. ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. आम्ही तिला खूप मिस करतो. तिला इथे येऊन खूप आनंद झाला असता. आणि काय बोलू?' 

मराठी कलाकारांचा युटर्न 

ज्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरुन दिवसभर रणकंदन सुरू होतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अखेर सुरळीत पार पडले... माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण पार पडलं... पुरस्कार घ्यायला जाणार नाही, असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले... मराठी कलाकार मंदार देवस्थळी, प्रसाद ओक यांनी हे पुरस्कार स्वीकारणार नाही, असं सांगत सकाळी सरकारवर टीका केली होती... त्याचबरोबर 'म्होरक्या'चे दिग्दर्शक अमर देवकर, बालकलाकार यशराज कऱ्हाडे आणि रमण देवकर यांनीही पुरस्कारसोहळ्यावरुन टीका केली होती.

पण, या सर्वांसह निपुण धर्माधिकारी, अविनाश सोनावणे या सगळ्या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले. 

फक्त अकरा पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत होणार होते... आणि इतर पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते होणार होते, याला कलाकारांचा विरोध होता.