जान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना?

कपूर कुटुंबातील खासगी कारण अखेर समोर; खुद्द Janhavi Kapoor केलं मोठं वक्तव्य  

Updated: Nov 5, 2022, 02:31 PM IST
जान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना? title=

Janhvi Kapoor and Kapoor Family : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या तिच्या 'मिली' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात जान्हवीने पहिल्यांदा वडील बोनी कपूर (Boney Kapoor) सोबत स्क्रिन शेअर केली. महत्त्वाचं म्हणजे जान्हवी स्टारकिड असल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. त्यामुळे तिच्या प्रोफेशन आणि खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान चर्चा रंगत आहे, की जान्हवी आतापर्यंत चुलत बहिण आणि अभिनेत्री सोनम कपूर अहूजाचा मुलगा वायूला भेटलेली नाही. 

जान्हवीने अद्याप कपूर कुटुंबातील नव्या पाहुण्याची भेट घेतली नसल्यामुळे कपूर सिस्टर्समध्ये काही बिनसलं आहे का? असे प्रश्न चाहते उपस्थितीत करत आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार कपूर कुटुंबात सर्व काही ठिक आहे. याबद्दल खुद्द जान्हवीने सांगितलं आहे. (sonam Kapoor son vayu)

सोनम कपूरने 20 ऑगस्ट 2022 रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. चिमुकल्याच्या आगमनामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी आहेत. पण जान्हवी आजही सोनमच्या मुलाला भेटली नाही, याचं कारण खुद्द जान्हवीने सांगितलं आहे.  (janhvi kapoor mili trailer)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली, 'मी वायूला अद्याप भेटलेली नाही. मी सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वायू खूप लहान आहे. पण मी शुटिंगसाठी प्रचंड प्रवास करते. मला त्याला भेटायचे आहे, परंतु मला भीती वाटते की त्याला माझ्याकडून संसर्ग होऊ शकतो...' ( janhavi kapoor song)

पुढे जान्हवी म्हणाली, 'माझं काम पूर्ण होताचं मी पहिल्यांदा वायूला भेटायला जाईल....' असं देखील अभिनेत्री म्हणाली. (Janhvi Kapoor and Kapoor Family)