आयएएफ गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक साठी वजन वाढवणार जाह्नवी कपूर

इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांची भूमिका जाह्नवी कपूर साकारणार आहे. 

Updated: Jan 29, 2019, 04:56 PM IST
आयएएफ गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक साठी वजन वाढवणार जाह्नवी कपूर title=

मुंबई: २०१८ साली आलेल्या 'धडक' सिनमाच्या माध्यमातून अभिनेत्री जाह्नवी कपूर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सिनेमातील 'झिंगाट' गाण्याने चाहत्यांनी विशेष दाद मिळवली. जाह्नवी सध्या इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ती दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त' सिनेमात झळकणार आहे. इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांची यशोगाथा जाह्नवी कपूर प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. या सिनेमासाठी जान्हवी कपूर विशेष मेहनत घेत आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार जान्हवी सिनेमासाठी आपले वजन वाढवणार आहे. वैमानिक गुंजन सक्सेना हे पात्र हुबेहुब साकारण्यासाठी जान्हवी 7 किलो वजन वाढवणार आहे. सिनेमाची शूटिंग फेब्रुवारी नाहीतर मार्च महिन्यापासून सुरु होईल.

जान्हवीने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये जान्हवी वैमानिकाच्या गणवेशात दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

कोण आहेत गुंजन सक्सेना

 गुंजन सक्सेना ह्या पहिल्या भारतीय आयएएफ वैमानिक आहेत. 1999 साली झालेल्या कारगील युद्धामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. युद्ध क्षेत्रात जावून त्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. कोणतेही शस्त्र जवळ नसताना त्यांनी शत्रूंसोबत दोन हात केले.

त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना शैर्य चक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गुंजन यांनी दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 
त्यांना आयएएफ मध्ये महिलांच्या पहिल्या वर्गात शिकण्याची संधी मिळाली.