जान्हवी कपूरने साडीवर घातला बोल्ड ब्लाऊज...चाहते घायाळ

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे काही छान फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत.

Updated: May 4, 2022, 04:24 PM IST
जान्हवी कपूरने साडीवर घातला बोल्ड ब्लाऊज...चाहते घायाळ title=

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्य आणि फॅशन स्टेटमेंटच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करते. आता पुन्हा एकदा जान्हवी  कपूरने तिचे काही छान फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याची बोल्ड स्टाइल चाहत्यांना रोज पाहायला मिळते. पारंपारिक असो की वेस्टर्न जान्हवी प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.

जान्हवी कपूर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवीने तिचे काही फोटो इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

यामध्ये ती फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे. यासोबत जान्हवीने मॅचिंग डीप नेक ब्लाउज पेअर केला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले.

अभिनेत्रीने मोठ्या कानातलेसह लुक ऍक्सेसरीझ केला. आता तिच्या चाहत्यांना जान्हवीची ही स्टाईल खूप आवडली आहे. जान्हवीने तिचे एकूण 4 फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. जान्हवी शेवटची हॉरर-कॉमेडी चित्रपट 'रुही' मध्ये दिसली होती. ती लवकरच 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे.