'तो विवाहीत...', जान्हवी कपूरनं विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी केला मोठा खुलासा

जान्हवी कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 27, 2022, 07:09 PM IST
'तो विवाहीत...', जान्हवी कपूरनं विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी केला मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सगळीकडेच आहे. जान्हवी तिचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'मिली' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवी असं काही बोलली ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. जान्हवी तिच्या चीज प्लॅटर क्रश विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. चीज प्लॅलर हा शब्द जान्हवीनं विजयसाठी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये वापरला होता. 

 जान्हवी कपूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये पोहोचली. जिथे तिच्यासोबत चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा झाल्या. तसेच रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आलं. या मजेशीर सेगमेंटमध्ये तिला अनेक प्रश्न विचारले जाणार होते. हे ऐकून जान्हवी हसायला लागली आणि पोटात काहीही पचत नसल्याची कबुली दिली. तिला कोणतीही गोष्ट कळली तर ती कोणाच्याही समोर बोलते असं ती म्हणाली. या हास्यविनोदात तिनं विजय देवरकोंडाबाबतचं एक गुपितही मीडियासमोर उघडलं. जान्हवी का स्वयंवर या मजेदार रॅपिड फायर सेगमेंटमध्ये जान्हवीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. जान्हवीला या अभिनेत्यांच्या कामाच्या आवडीनुसार रेट करण्यास सांगितले होते. हृतिक रोशन, रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आदित्य रॉय कपूर? या प्रश्नावर जान्हवी थोडी गोंधळली, पण उत्तरात सगळ्यांचे नाव घेतले. 

यानंतर जान्हवीला विचारले की तिला तिच्या स्वयंवरमध्ये कोणाला पार्टीसिपेट करताना पाहायला आवडेल? जान्हवी हृतिक, रणबीर आणि टायगरची नावे घेते. रणबीर विवाहित असला तरी जान्हवी पुन्हा विचार करू लागते आणि टायगरचे नाव घेते.

जान्हवीच्या या उत्तरांवर विजय देवरकोंडाचे नाव प्रॉम्प्ट केलं आहे. यावर जान्हवी लगेचच उत्तर देते की तो  Practically Married आहे. तिच्या उत्तरात जान्हवी विजय देवरकोंडाचं विवाहीत असल्याचे सांगते. यानंतर जान्हवी हसायला लागते. तुम्हाला आठवत असेल की काही काळापूर्वी जान्हवी सारा अली खानसोबत 'कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी झाली होती. जिथे तिने विजय देवराकोंडावर क्रश असल्याची कबुली दिली. दोघांनी डेट वर गेल्याचे देखील कबुल केले आहे.  

अनेक महिन्यांपासून विजय देवरकोंडा रश्मिका मंदान्नासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा सुरु होत्या. दोघेही नुकतेच एकत्र ट्रीपला गेल्याचे वृत्त समोर आले होते. विजय आणि रश्मिका देखील विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. दोघेही एकत्र मालदीवला गेल्याचे त्यावरून म्हटले जात होते. मात्र विजय किंवा रश्मिका या दोघांनीही या बातमीली दुजोरा दिलेला नाही. विजय देवरकोंडानं धर्मा प्रॉडक्शनच्या 'लाइगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपयशी ठरला. अलीकडेच दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी खुलासा केला होता की, विजयच्या विरुद्ध अनन्या पांडे नव्हे तर जान्हवी पहिली पसंती होती.