Kiran Mane on Janhvi Kapoor : मिस्टर अँड मिसेस माही (Mr.and Mrs.Mahi ) या धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao)आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही जोडी आपल्या प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. अशातच आता नुकत्याच द ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने गांधी आणि आंबेडकरांबद्दलच्या (Ambedkar and Gandhi) तिच्या विचाराबद्दल सांगितलं. आंबेडकर आणि गांधी यांचे काही विषयांवर विचार कसे होते? आणि गांधी आणि आंबेडकर यांचा तिच्यावर कसा प्रभाव पडला? यावर जान्हवीने वक्तव्य केलंय. जान्हवीचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावर आता किरण माने (Kiran Mane) यांनी जान्हवीचं कौतूक केलंय.
काय म्हणाली जान्हवी कपूर?
मला वाटतं की आंबेडकर आणि गांधी यांच्यातील चर्चा खूप मनोरंजक असते. त्यांच्यातील चर्चाच नाही तर त्यांचे मतप्रवाह कसे बदलत गेले.. एका विषयावर त्यांचे विचार कसे होते.. त्यांनी एकमेकांना प्रभावित देखील केलंय. भारतीय समाजाला या दोन्ही महान व्यक्तींनी खूप वेगळी दिशा दिली. दोघांना एकमेकांबद्दल काय वाटायचं, हे खूप रोमांचक आहे. गांधी आणि आंबेडकर यांचे मतप्रवाह नक्कीच वेगळे होते. आंबेडकरांचे विचार नेहमी सरळ आणि स्पष्ट असायचे. तर गांधींचे विचार विकसित होत गेले. मला वाटतं की, तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून याबद्दल अधिक जाणून घेणं आणि ते स्वतःच सहन करणं याच खूप फरक आहे, असं जान्हवी कपूर म्हणाली.
जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय.... अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हाॅटस् ॲपवर… pic.twitter.com/d2oldi7zOe
— Kiran Mane (@kiranmane7777) May 24, 2024
किरण माने काय म्हणाले?
जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय. माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय. अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हॉट्स् ॲपवर फॉर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही.. हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.