व्हिडिओ : जान्हवी कपूरची बहिण खुशीवरही चढली झिंगाटची झिंग...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

Updated: Jul 21, 2018, 11:27 AM IST
व्हिडिओ : जान्हवी कपूरची बहिण खुशीवरही चढली झिंगाटची झिंग...

मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. नुकताच तिचा धडक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जान्हवीच्या या पर्दापणात संपूर्ण कपूर कुटुंबिय तिच्या पाठीशी उभं आहे. मग जान्हवीची बहिण खुशी तरी कशी मागे राहिल. धडक च्या ट्रेलर लॉन्च वेळी खुसी भावुक झाली होती. आता धडक मधील झिंगाट गाण्यावर खुशीने ठेका धरला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे.

झिंगाट गाण्याचा फिव्हर सर्वांवरच आहे आता खुशीलाही त्याची झिंग चढलेली दिसते. तुम्हीही पहा खुशीचा हा झिंगाट डान्स...