जान्हवी कपूरच्या 'या' व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या झटपट कसे बनवाल सिक्स पॅक अ‍ॅब्स

अभिनेत्री श्रीदेवींच्या नृत्याने, अभिनयाने हिंदी सिनेक्षेत्राचा एक काळ खास गाजला होता. आता कपूर कुटुंबियाची पुढील पिढी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे. 

Updated: Dec 19, 2017, 06:41 PM IST
जान्हवी कपूरच्या 'या' व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या झटपट कसे बनवाल सिक्स पॅक अ‍ॅब्स  title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या नृत्याने, अभिनयाने हिंदी सिनेक्षेत्राचा एक काळ खास गाजला होता. आता कपूर कुटुंबियाची पुढील पिढी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे. 

जान्हवी ही श्री देवींची मुलगी मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट' च्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. ईशान खट्टरसोबत जान्हवी ही जोडी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.  

खास जिम फंडा 

जान्हवी अभिनयासोबतच जिममध्येही घाम गाळत  आहे. 'सिक्स पॅक अ‍ॅब्स' बनवणं हा अनेकांना काठीण वाटणारा फिटनेसचा एक भाग वाटतो. पण जान्हवीने चक्क पाच मिनिटांत सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवणारा खास फंडा दाखवला आहे.  

जान्हवीच्या एका फॅन क्लबने हा व्हिडिओ बनवला आहे.  जान्हवीच्या ट्रेनरसोबतचा एक फनी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

 

'धडक'कडे लक्ष 

शशांक खैतान दिग्दर्शित आणी करण जोहर निर्मित 'धडक' हा सैराटचा हिंदी रिमेक आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.   चित्रपटाची घोषणा झाली त्याच दिवशी जान्हवीचा इंस्टाग्रामवरही डेब्यू झाला.