... म्हणून अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ची सोशल मीडियावर चर्चा

टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटानंतर अक्षयच्या चाहत्यांचे लक्ष त्याच्या आगामी 'पॅडमॅन' या चित्रपटाकडे लागले आहे.

Updated: Dec 19, 2017, 05:55 PM IST
... म्हणून अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ची सोशल मीडियावर चर्चा  title=

मुंबई : टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटानंतर अक्षयच्या चाहत्यांचे लक्ष त्याच्या आगामी 'पॅडमॅन' या चित्रपटाकडे लागले आहे.

मासिकपाळी या विषयाबाबत आपल्या संस्कृतीमध्ये फार उघडपणे बोलले जात नाही. पण 'पॅडमॅन' या चित्रपटातून पहिल्यांदा हा विषय मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

कोण आहे 'पॅडमॅन'मध्ये ? 

पॅडमॅन या चित्रपटामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. अक्षयच्या पत्नीचे काम राधिका आपटे साकारत आहे. तर अक्षयसोबत अभिनेत्री सोनम कपूर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ' पॅडमॅन'  या चित्रपटाची निर्मिती आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती निर्मितीक्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक आर बाल्की चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.  

 

 

सोशल मीडियावर ट्रेन्ड  

14 डिसेंबरला 'पॅडमॅन'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या पाच दिवसांमध्ये या ट्रेलरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सोबतच  आता हा ट्रेलर युट्युबवरही ट्रेन्ड होत आहे.  ट्रेलरमध्ये सध्या हा ट्रेन्डिंग आहे. तो अव्वलस्थानी आहे. 

अल्पावधीतच या ट्रेलरने 400K लाईक्सचा टप्पा  पार केला आहे. 

अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर आणि सत्य कथेवर आधारित हा सिनेमा आहे.