बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी चित्रपट दिग्दर्शक तसंच प्रेक्षक आधुनिक महिलांबद्दल नेमकं काय विचार करतात यावर भाष्य केलं आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि दिवंगत श्रीदेवी (Sridevi) यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी केलेल्या भूमिकांची उदाहरणं देताना त्यांनी पडद्यावर समकालीन स्त्रीच्या चित्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांची मुलगी झोया अख्तरदेखील उपस्थित होती.
नेमकी आधुनिक महिला कोण आहे याबद्दल आपण अद्यापही गोंधळलेले असून आपल्या चित्रपटांमध्येही तेच दिसतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'मदर इंडिया'मधील नर्गिस आणि 'साहेब, बीवी और गुलाम'मध्ये मीना कुमारी यांसारख्या अभिनेत्रींसाठी तशा प्रकारच्या भूमिका लिहून त्यांच्या काळातील समकालीन महिला घडवल्या, पण आजकाल तशा प्रकारचे लेखन दिसत नाही, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं
जावेद अख्तर म्हणाले की, "जेव्हा समाज समकालीन नैतिकता आणि आकांक्षांबद्दल स्पष्ट असेल, तेव्हा उत्तम लेखन होऊ शकतं. लेखक हा समाजाचा एक भाग आहे, जो त्यांच्यातच वावरत असतो. अशाच प्रकारे उत्तम भूमिका उदयास येतात. 'साहेब, बीवी और गुलाम'मध्ये मीना कुमारी. , 'मदर इंडिया' मधील नर्गिस आणि 'गाईड' मधील वहिदा रेहमान या उत्तम उदाहरण आहेत, तथापि, जेव्हा नैतिकता अस्पष्ट असते तेव्हा समस्या उद्भवतात".
जावेद अख्तर यांनी 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आणि कशाप्रकारे महिलांच्या भूमिका खालच्या पातळीवर गेल्या हे सांगितलं. समाज अजूनही स्त्रियांची व्याख्या करणाऱ्या संकल्पनांमध्ये रेंगाळत आहे आणि सिनेमातील स्त्री पात्रांना दिलेली वागणूक याचाच परिणाम आहे असं जावेद अख्तर म्हणाले. "आता श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्याकडेच पाहा. त्या भूतकाळातील कोणत्याही तथाकथित नायिकेपेक्षा कमी प्रतिभाशाली नव्हत्या. पण त्यांना एक तरी मोठी भूमिका मिळाली का? कोणीही त्यांचं शत्रू नव्हतं. पण त्यावेळी समाज समकालीन स्त्रीबद्दल स्पष्ट नव्हता," असं जावेद अख्तर म्हणाले.
जावेद अख्तर यांनी यावेळी झोयाच्या कामाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की तिच्या चित्रपटांमधील स्त्री पात्रे 'आधुनिक स्त्री' च्या कल्पनेला अनुसरुन असतात. "'मी शांत राहणार हे आता बाहेर पडलं, पण आत कोण आहे? कोणालाच माहिती नाही. आजपर्यंत आपण आधुनिक स्त्री कोण आहे याच्या शोधात असून अंधारात चाचपडत आहोत. झोयाने मला सांगितले होते, 'तुम्ही स्टेजवर माझी स्तुती करू नका. पण झोया, तुझ्या चित्रपटात मी पाहिलेली एकमेव समकालीन स्त्री आहे," असं जावेद अख्तर म्हणाले.
जावेद अख्तर आणि सलीम खान यांचे जीवन आणि कार्य दर्शविणारी वेब सीरिज प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या 'अँग्री यंग मेन' रिलीज झाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांमधील स्त्री पात्रावरही भाष्य केलं. मालिकेच्या एका टप्प्यावर, अख्तर यांनी कबूल केलं की त्यांच्या चित्रपटांमध्ये सशक्त स्त्री पात्रं लिहिण्याची संवेदनशीलता निर्माण झाली नाही. पण अजाणतेपणे काही महिला पत्र सशक्त लिहिल्याचं म्हटलं.