'या' Actress ला Transparent Dress मध्ये रस्त्यावर चालताना पाहून नेटकरी म्हणाले, 'नेहमीप्रमाणेच...'

Actress चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Feb 26, 2023, 06:47 PM IST
'या' Actress ला Transparent Dress मध्ये रस्त्यावर चालताना पाहून नेटकरी म्हणाले, 'नेहमीप्रमाणेच...' title=

Jennifer Lawrence Transparent Dress Photo Viral : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स (Jennifer Lawrence) ही जगातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जेनिफर ही जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयचं नाही तर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. जेनिफर ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखी जाते. जेनिफर तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. दरम्यान, जेनिफरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत जेनिफरनं ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला आहे. 

काही वर्षांपूर्वी जेनिफर लॉरेन्सने ट्रान्सपरेंट ड्रेस घालून एक फोटोशूट केले होते. जेनिफरचे या ग्लॅमरस फोटोशूटमधील फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. जेनिफर ही सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी तिची सोशल मीडियावर तिचे लाखोच्या संख्येत नाही तर कोटीच्या संख्येत चाहते आहेत. जेनिफरचे हजारो फॅन पेज देखील आहेत. त्यावर नेहमीच जेनिफरचे फोटो व्हायरल होत असतात. जेनिफरच्या इतक्या फॅनपैकी एका फॅनपेजनं जेनिफरचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Jennifer Lawrence Transparent Dress Photo) 

हेही वाचा : 'बाईच बाईची...', Gautami Patil च्या व्हायरल न्यूड व्हिडीओचे सोशल मीडियावर पडसाद

जेनिफर लॉरेन्सनं हा फोटो 2018 साली ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोत जेनिफर सुंदर दिसत असून तिनं अतिशय सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हाच फोटो सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या ड्रेसला एक स्लिट देखील आहे. तिचा हा शिमरी ड्रेस अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवर नेटकरी फीदा झाले आहेत. फोटोवर नेटकरी लाईक्स आणि शेअर करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणला, 'नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते.' जेनिफर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट 'कॉजवे' मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. जेनिफर लॉरेन्सची गणना जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जास्त असून दिवसेंदिवस तिचा चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. (Jennifer Lawrence Bold Photo)