'दीपिकाच्या भूमिकेचं स्वागत करायला हवं'

जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया 

Updated: Jan 8, 2020, 03:49 PM IST
'दीपिकाच्या भूमिकेचं स्वागत करायला हवं' title=

मुंबई : जेएनयूच्या हिंसाचारावर अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यापिठातील विद्यार्थ्यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. दीपिकाच्या जाण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेकांनी दीपिकाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय तर अनेकांनी दीपिकाची 'छपाक' सिनेमाकरता प्रमोशन स्ट्रॅटेजी असल्याचं म्हटलं आहे. 

दीपिकाच्या जाण्यावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आता प्रतिक्रिया दिल्या आहेत.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हटले आहेत की,'दीपिका पदुकोण काल जेएनयूमध्ये गेली होती, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. तसेच तिने घेतलेल्या भूमिकेचं देखील स्वागत केलं पाहिजे', अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी तिच्या मताचा आदर केला आहे. (आरारारारा.... प्रविण तरडे 'त्या' कमेंटमुळे ट्रोल) 

पुढे ते हे ही म्हणाले,' हल्ली कुणी भूमिकाच घेताना दिसत नाही. तिच्यावर कालपासून टीका होतंय त्याचा निषेध करायला हवा. ज्याप्रकारे तिला धमक्या दिल्या जातायत ती संस्कृती नाही. त्यामुळे याचा विचार केला गेला पाहिजे. एवढंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेत त्या विद्यार्थ्यांची बाजू मी गृहमंत्र्यांकडे मांडतोय,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. 

जितेंद्र आव्हाडांप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,' जेएनयूमध्ये झालं त्यावर कुणीही प्रतिक्रिया देऊ शकतं. मग ती विरोधात का असेना? दीपिका पदुकोण यांनी तिथे जाऊन काही चुक केलेली नाही,'