जेएनयू भेटीनंतर पायल रोहतगीची दीपिकावर टीका

पायल रोहतगीचा दीपिकावर निशाणा... 

Updated: Jan 8, 2020, 03:11 PM IST
जेएनयू भेटीनंतर पायल रोहतगीची दीपिकावर टीका title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मंगळवारी जेएनयूमध्ये पोहचली होती. तिने जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. परंतु याबाबत तिने कोणतंही वक्तव्य केलं नाही. दीपिका जेएनयूत पोहचल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेएनयूत जाण्याच्या निर्णयाबाबत काहींनी दीपिकाला शूर म्हटलंय. तर काहींनी तिचं जेएनयूत जाणं एक पब्लिसिटी स्टंट किंवा प्रमोशनल फंडा असल्याचं म्हटलंय. अभिनेत्री पायल रोहतगीने दीपिकावर निशाणा साधत तिला इडियट असल्याचं म्हटलंय. 

पायल रोहतगीने ट्विट करत, दीपिकाच्या वडिलांनी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकली आहेत. तर दुसरीकडे दीपिका भारताला तोडणाऱ्यांसोबत उभी असल्याचं म्हटलंय. दीपिकाने ती आलिया भट्टची बेस्ट फ्रेन्ड असल्याचं दाखवून दिल्याचंही ती म्हणाली आहे.

'छपाक' दिग्दर्शिक मेघना गुलजार यांनी, जेएनयूत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी दीपिकाचं ब्रेन वॉश केलं असल्याची टीकाही पायलने केली आहे. 

दीपिका जेएनयूत दाखल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या जेएनयू एन्ट्रीनंतर एकीकडे तिला शूरवान तर दुसरीकडे 'छपाक' बॉयकॉट करण्याची चर्चा सुरु आहे. येत्या १० जानेवारी रोजी 'छपाक' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

दीपिका जेएनयू कॅम्पसमध्ये जवळपास १० मिनिटांपर्यंत होती. दीपिकाचा आगामी 'छपाक' चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'छपाक'च्या प्रदर्शनाच्या काही दिवसच आधी दीपिका जेएनयूत  पोहचल्यामुळे काही लोक याला पब्लिसिटी स्टंट असल्याचं बोलतात. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेन्ड होण्यास सुरुवात झाली.