टीझर : जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला'

अतरंगी भूमिकेत जितू 

Updated: Dec 19, 2019, 04:43 PM IST
टीझर : जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला'  title=

मुंबई : प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता जितेंद्र जोशी अतरंगी भूमिकेत दिसणार आहे. अतिशय साध्या अशा चोराची भूमिका जितेंद्र साकारत आहे. 

या सिनेमातील जितूचा लूक पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला असून आता जितूचा एक टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. जितूनं सिनेमात नंदन व्यक्तिरेखा साकारली आहे. जितूसह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसतील. या सर्वांचे लूक टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत.  'मस्का' या सिनेमानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून 'चोरीचा मामला' हा दुसरा सिनेमा आहे. 

या टीझरमध्ये फक्त आता जितेंद्र जोशी दिसत आहे. अद्याप सिनेमातील इतर कोणत्याही कलाकारांची ओळख झालेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शनने सिनेमाचं लेखन केलं असून चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. ३१ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.