जोनस ब्रदर्स मोठ्या अडचणीत; महिलेने केले गंभीर आरोप

जोनस ब्रदर्स वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

Updated: Nov 29, 2020, 03:43 PM IST
जोनस ब्रदर्स मोठ्या अडचणीत; महिलेने केले गंभीर आरोप

मुंबई : ग्लोबल अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या प्रियंका चोप्राचा पती निक जोनस आणि त्याचे दोन भाऊ जो जोनस आणि केविन जोनस सध्या चांगलेचं चर्चेत आहे. एका महिलेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप केल्यामुळे जोनस ब्रदर्स वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय सोशल मीडियावर जोनस ब्रदर्स ट्रेंड करत आहे. Thanksgiving dayच्या दिवशी या महिलेने तिघा भावांवर आरोप केले. थाँक्सगिव्हिंगच्या परेडच्या निमित्ताने या तिन्ही भावांनी संबंधित महिलेची चेष्टा केल्याचे आरोप आहेत.

जोनस ब्रदर्सवर आरोप लगावणाऱ्या महिलेचं नाव टेलर गॅरॉन असून ती न्ययॉर्कच्या ब्रुकलाइन शहरातील राहणारी आहे. ती एक लेखिका आणि स्टँड अप कॉमेडियन आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने जोनस ब्रदर्सवर निशाणा साधला आहे. 

ती म्हणाली, 'थाँक्सगिव्हिंग दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.. एक दिवस थँक्सगिव्हिंग परेडमध्ये मी जोनस ब्रदर्ससोबत होते. त्यावेळी त्या तिघांनी माझी चेष्ठा केली.' असं म्हणत तिने ट्विटरवर एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

फोटो शेअर करत ती म्हणते त्याठिकाणी त्यावेळेस प्रचंड पाऊस होता.. सर्व काही ठिक होत, मात्र जोनस ब्रदर्सना सोडून...' दरम्यान याप्रकरणी अद्याप जोनस ब्रदर्स किंवा प्रियंका चोप्राने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.