मुंबई : देशात कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे अनेकांना लागण झाल्याने त्रास होत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीचं नुकसान होत असतानाच अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. काही सेलेब्रिटींनाही संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. आता दक्षिणचा सुपरस्टार जुनिअर एनटीआर सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. (N. T. Rama Rao Jr. tests positive for COVID-19)
ज्युनियर एनटीआरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'माझी कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, कृपया काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला वेगळे ठेवले आहे. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व कोविड प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. मी गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांना त्यांची कोविड चाचणी करवून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा.
I’ve tested positive for Covid19. Plz don’t worry,I’m doing absolutely fine. My family & I have isolated ourselves & we’re following all protocols under the supervision of doctors. I request those who’ve come into contact with me over the last few days to pl get tested. Stay safe
— Jr NTR (@tarak9999) May 10, 2021
'ही पोस्ट सोशल मीडियावर आल्यापासून त्याचे चाहते पोस्टवर कमेंट करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
एस.एस. राजामौलच्या बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआरमध्ये तो दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता राम चरण सोबत महत्वाची भूमिका साकारत आहे. आरआरआर हा एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे, हा चित्रपट दोन तेलुगू स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे.
चित्रपटामध्ये राम चरण अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत दिसणार असून ज्युनिअर एनटीआर कोमाराम भीमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य अभिनेत्री आहे. याशिवाय बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगनसुद्धा या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
हा सिनेमा 13 ऑक्टोबरला तेलगूसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन 'बाहुबली' चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली करत आहेत.