बॉलिवूडचा चॉकलेट हिरो एकाऐकी गायब, आता दिसतो असा?

निळ्या रंगाचे डोळे असलेला चॉकलेट बॉय आता असा दिसतो

Updated: Jul 26, 2021, 08:13 AM IST
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो एकाऐकी गायब, आता दिसतो असा?

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे सिनेमात काम करून, लोकप्रिय होऊनही गुमनाम राहिले. अशाच एका कलाकाराचा आज वाढदिवस. या अभिनेत्याचं नाव आहे जुगल हंसराज (Jugal Hansraj). बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा जुगल हंसराजचा आज वाढदिवस.

जुगलचा जन्म 26 जुलै 1972 साली झाला. जुगल हंसराजने एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 'मासूम' सिनेमात काम केलंय. हा सिनेमा 1986 मध्ये प्रदर्शित झालेला. या सिनेमात नसीरूद्दीन शाह आणि शबाना आजमी मुख्य भूमिकेत होते. जुगलने इतर सिनेमातही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलंय. जुगलचा आज 49 वा वाढदिवस. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jugal Hansraj (@thejugalhansraj)

'आ गले लग जा' या सिनेमातून जुगलने बॉलिवूडमध्ये लीड रोलमध्ये एन्ट्री केली आहे. हा सिनेमा 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात उर्मिला मातोंडकर होती. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक सिनेमा येतो जो त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेतो. असाच जुगलचा 2000 साली प्रदर्शित झालेला 'मोहब्बते'. या सिनेमाने अभिनेत्याला अधिक लोकप्रियता मिळवून दिली. शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन या सिनेमात होते. 

कुठे आहे हे जुगल? 

जुगल हंसराज यावेळी अमेरिकेत आहे. अभिनेता 2014 मध्ये आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड जॅस्मीनसोबत लग्न केलं. आणि तो तिच्यासोबत अमेरिकेत शिफ्ट झाला. जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. जुगल सोशल मीडियावर देखील कमी ऍक्टिव आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्याबद्दल फार कमी माहिती मिळते. काही दिवसांपूर्वी जुगलने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.