प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, चित्रपट विश्वात एकचं चर्चा

'मी एकाचवेळी दोन पुरुषांसोबत...', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने फिल्मी जगतात एकचं खळबळ 

Updated: Aug 29, 2022, 04:56 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, चित्रपट विश्वात एकचं चर्चा  title=

मुंबई : असे अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री आहेत जे त्यांच्या अनेक मुलाखतीत पर्सनल आय़ुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत असतात. आता  अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक विधान केले आहे. हे विधान एकूण फिल्मी जगतात एकचं खळबळ माजलीय.  

अभिनेत्रीचं विधान काय? 
प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. प्रमोशनच्या या कार्यक्रमात बोलताना तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणते की, मी माझ्या आयुष्यात तो अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये एक स्त्री एकाच वेळी दोन पुरुषांच्या प्रेमात पडते. तिच्या या विधानाची चित्रपट विश्वात खुप चर्चा रंगलीय आहे. तसेच अभिनेत्रीच्या या विधानानंतर तिला ट्रोल केलं जातंय. तिच्या या विधानावर चाहते वाईट कमेंट करतायत.  

ऑस्कर विजेती ज्युलियन बिनोशे हिचा बोथ साइड्स ऑफ ब्लेड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि चित्रपटाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी या परिस्थितीचा सामना केला आहे आणि जेव्हा मी दोन पुरुषांच्या प्रेमात पडते तेव्हा काय होते हे मला माहीत आहे.किती कठीण काम आहे हे. त्यामुळे जेव्हा ही कथा माझ्यापर्यंत आली तेव्हा मला वाटले की त्यात काहीतरी असावे, ज्याचा मी माझ्या आयुष्यातही सामना केला आहे, असे ती म्हणतेय.  

बिनोशे पुढे म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात तो अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये एक स्त्री एकाच वेळी दोन पुरुषांच्या प्रेमात पडते. तिच्या या विधानाची एकचं चर्चा रंगली आहे. दरम्यान बिनोचे यांनी दोन लग्ने झाली असून या दोन लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत.  

ज्युलियन बिनोशे ही एक फ्रेंच अभिनेत्री आहे. हॉलीवुड फिल्म द इंग्लिश पेशेंट (1996) साठी सहाय्यक कलाकार म्हणून ज्युलियन बिनोशेला ऑस्कर अॅवार्ड देण्यात आला होता. 

दरम्यान ज्युलियन बिनोशेचा बोथ साइड्स ऑफ ब्लेड हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.