'ज्युरासिक पार्क' फेम दिग्दर्शकाच्या मुलीने सांगितलं, 'हो मी पॉर्नस्टार आहे'

करिअरच्या दृष्टीने निवडला हा मार्ग.... 

Updated: Feb 21, 2020, 02:29 PM IST
'ज्युरासिक पार्क' फेम दिग्दर्शकाच्या मुलीने सांगितलं, 'हो मी पॉर्नस्टार आहे'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ज्युरासिक पार्क आणि अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग  Steve Spielberg यांच्या नावाच्या अनेक चर्चांनी सध्या कलाविश्वात तग धरला आहे. चर्चा होण्यास कारण ठरत आहे ती म्हणजे त्यांची मुलगी मिकेला Mikaela. नुकतीच मिकेलाविषयीची अत्यंत अनपेक्षित माहिती समोर आली आहे. 

असं म्हटलं जात आहे की, मिकेलाने करिअरच्या दृष्टीने पॉर्न स्टार होण्याचा निर्णय घेतला आहे. 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत तिनेच याविषयीचा खुलासा केला. आपण स्वत:च स्वत:चे पॉर्न व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केल्याचं मिकेलाने सांगितलं. या निर्णयाविषयी तिने आईवडिलांनाही सांगितलं. पण, यावर त्यांनी आक्रस्ताळपणे व्यक्त न होता तिला पाठिंबा दिला. मिकेला ही स्टीव्हन स्पिलबर्ग आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री केट कॅपशॉ यांची दत्तक कन्या आहे. 

अमेरिकेतील टेनेसीमध्ये नॅशविल भागात राहणाऱ्या २३ वर्षीय मिकेलाने या मुलाखतीत सांगितलं की, 'मी जेव्हा आई- वडिलांना या निर्णयाविषयी सांगितलं तेव्हा ते या निर्णयावर नाराज झाले नाहीत. उलटपक्षी त्यांनी मला पाठींबा  दिला'. काही दिवसांपूर्वीच मिकेलाने तिच्या या करिअरच्या निवडीविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनाही माहिती दिली होती. आईवडिलांवर आर्थिकदृष्टा आपण अवलंबून असल्याची परिस्थिती बदलण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 


छाया सौजन्य- सोशल मीडिया 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

मिकेलाने केलेला हा मोठा खुलासा सध्या कला जगतात चर्चेचा मुद्दा ठरत आहे.  प्रसिद्ध अमेरिकन निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक  स्टीव्हन स्पिलबर्ग यांची कन्या असल्यामुळे या चर्चांना आणखी वाव मिळत आहे. 'ज्युरासिक पार्क' व्यतिरिक्त 'सॉ', 'शिंडलर्स लिस्ट', 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' आणि 'रिंकन' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी साकारले आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x