ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम चा ट्रेलर रिलीज

  'ज्युरासिक पार्क' या चित्रपटाने जगभरात वाहवा कमावली आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 5, 2017, 05:31 PM IST
ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम चा ट्रेलर रिलीज  title=

मुंबई :  'ज्युरासिक पार्क' या चित्रपटाने जगभरात वाहवा कमावली आहे.

आता या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. त्याची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. 

टीजर रिलीज  

ज्युरासिक पार्कच्या सिक्वेलचं नाव 'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’असे आहे. या चित्रपटामध्ये डायनॉसोर आणि त्यांच्या विश्वामध्ये अडकलेली काही लोकं हा संघर्ष दाखवण्यात आला आहे.   
'पळायला तयार रहा..' असा संदेश या चित्रपटाच्या टीजरमध्ये देण्यात आला आहे. ८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

 

 

कलाकार कोण ? 

 'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’या चित्रपटामध्ये  क्रिस प्रैट प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.  या चित्रपटामध्ये  जेफ गोल्डब्लम, क्रिस प्रैट, ब्राइस डलास हॉवर्ड आणि  इयान मैल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
 
  'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’या चित्रपटाचे दिग्दर्शन जे.ए. बेयोन यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज  होणार आहे.  

  
 अमेरिकेच्या आधी भारतामध्ये प्रदर्शन 
 

  'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’हा चित्रपट भारतामध्ये ८ जून २०१८ रोजी रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये २२ जून रोजी रिलीज होणार आहे.  
  
  ज्युरासिक पार्कच्या पहिल्या भागामध्ये अभिनेता इरफान खानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.