जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Hyderabad Encounter Case:  9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 23, 2024, 11:12 PM IST
जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?  title=

Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अक्षय शिंदे यांची आत्महत्या नसून एन्काऊंटर करण्यात आल्यचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदे  याच्या कथित एन्काऊंटर मुळे पाच वर्षापूर्वी हैदराबादमध्ये झालेला एन्काऊंटर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एन्काऊंटर करत पोलिसांनी 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा केला आणि फक्त  9 दिवसात पीडितेला न्याय दिला. पोलिसांच्या या रोखठोक भूमिकेचे देशभरात कौतुक झाले. 

27 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. अवघ्या 9 दिवसात पीडितेला न्याय मिळाला. 6 डिसेंबर 2019 रोजी हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येतील चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आला. घटनास्थळी नेत असताना पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार आरोपींना गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. घटनास्थळी गेल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्लाही केला. त्यामुळे पोलीस आणि आरोपींमध्ये झालेल्या चकमक झाली. या चकमकीत चारही आरोपी ठार झाले. 

15 मिनिटांत खेळ खल्लास 

हैदराबादमधला राष्ट्रीय महामार्ग 44...... शमशाबाद टोलनाक्याजवळ हा थरार घडला.  बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार आरोपींना पोलीस पहाटे साडे पाचच्या सुमाराला घटनास्थळी घेऊन आले.  तिथेच जिथे या नराधमांनी पीडितेवर बलात्कार करुन तिचा मृतदेह जाळून टाकला होता.  घटनास्थळावरुन काही पुरावे गोळा करण्यासाठी आणि रिक्रेएशन करण्यासाठी पोलीस आरोपी मोहम्मद आरिफ, जोलु शिवा, जोलु नवीन, चेन्नाकेशावुलूला घटनास्थळी घेऊन आलें..... दहा पोलिसांचा ताफा आणि चार आरोपी घटनास्थळी पोहोचले..... त्यावेळी चारही आरोपींनी  दगड, काठ्यांनी पोलिसांवर हल्ला करायला सुरुवात केली. आरिफ आणि चेन्नाकेशावुलूनं पोलिसांच्या हातातून बंदुका हिसकावल्या आणि गोळीबार सुरू केला.  पोलिसांनी आधी या चारही आरोपींना शरण यायला सांगितलं... पण आरोपींनी ऐकलं नाही... मग पोलिसांनीही गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामध्ये चारही आरोपींना गोळ्या लागल्या आणि ते ठार झाले.  या चकमकीत दोन पोलीसही जखमी झाले. 15 मिनिटांत एन्काऊण्टर संपलं... पोलीस म्हणाले लॉ हॅज डन इटस ड्युटी... म्हणजेच कायद्यानं त्याचं कर्तव्य बजावलं...  अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.