जस्टिन बिबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर, जस्टिन बिबरची महत्त्वाची घोषणा

Updated: Jul 20, 2022, 01:37 PM IST
जस्टिन बिबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! title=

मुंबई: सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने काही दिवसांपूर्वी रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) नावाच्या आजाराशी झुंज देत होता. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था झाली. यामुळे चेहऱ्याचा पॅरेलिसिस (अर्धांगवायू) या समस्येचा त्याला सामना करावा लागत होता. तर, जस्टिनला त्याचे अनेक शो रद्द करावे लागले. दरम्यान, आता जस्टिननं एक घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

जस्टिन लवकरच वर्ल्ड टूर सुरु करणार आहे. त्याच्या या वर्ल्ड टूरचं नाव 'जस्टिस वर्ल्ड टूर' (Justice World Tour) आहे. नुकतीच याची जस्टिननं घोषणा केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी जस्टिनचा नवी दिल्लीत शो होणार आहे. हा शो जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जस्टिनच्या या टूरची सुरुवात इटलीच्या लुक्का समर फेस्टिवलमध्ये होणार आहे. युरोपमधून सुरु होणाऱ्या या टूरमध्ये जस्टिन भारत आणि आशिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर राहील. त्यानंतर २०२३ मध्ये तो युरोपमध्ये परतेल. 

त्याच्या या शोची आता पर्यंत १. ३ मिलियन पेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. तर मार्च २०२३ पर्यंत जस्टिन ३० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करणार आहे. यावेळी जस्टिनचे १२५ पेक्षा जास्त शो होणार आहेत. दिल्लीच्या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत ही ४ हजार पेक्षा जास्त आहे. या शोचे तिकिट हे बूक माय शो या अॅपवरून बूक करू शकता.