VIDEO : रजनीकांत आणि नानाच्या 'काला'चा ट्रेलर हीट!

याआधी आलेल्या टीझरमध्ये दिसलेला  'काला, कैसा नाम है रे...' हा नाना पाटेकर यांचा डॉयलॉगही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलाय. 

Updated: May 29, 2018, 09:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ सिनेमाचा सुपरस्टार रजनीकांत यांचा आणखी एक सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे... हा सिनेमा म्हणजे 'काला'... या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांचीही मुख्य भूमिका असल्यानं मराठी दर्शकही या सिनेमासाठी उत्सुक आहेत... या सिनेमाच्या निमित्तानं रजनी आणि नाना अशा दोन मराठमोळ्या अभिनेत्यांची जुगलबंदीच या सिनेमात पाहायला मिळणार आहे.   

या चित्रपटामध्ये रजनीकांत हा डॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. याआधी आलेल्या टीझरमध्ये दिसलेला  'काला, कैसा नाम है रे...' हा नाना पाटेकर यांचा डॉयलॉगही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलाय. 

'काला' या सिनेमात रजनीकांत- नाना यांच्यासोबतच अंजली पाटील, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी आणि समुथिरकानीसारखे दिग्गज कलाकार आहेत. धनुष हा या सिनेमाचा निर्माता आहे.