close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची प्रशंसा; अभिनेत्री काजल अग्रवाल ट्रोल

चित्रपटाचं कौतुक करणं काजलला चांगलंच महागात पडलं आहे.

Updated: Apr 12, 2019, 12:13 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची प्रशंसा; अभिनेत्री काजल अग्रवाल ट्रोल

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेता, अभिनेत्रींना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केलं जातं. अनेकदा सेलिब्रिटिजना त्यांच्या कपड्यांवरून, त्यांनी केलेल्या एखाद्या विधानावरूनही ट्रोल केलं जातं. बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाललाही एका विधानावरून ट्रोल करण्यात आलं आहे. चित्रपटाचं कौतुक करणं काजलला चांगलंच महागात पडलं आहे. काजल अग्रवालने विवेक ओबेरॉयच्या आगामी 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं कौतुक केल्यानंतर काजलला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असेलल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकची काजलने प्रशंसा केली. विवेक ओबेरॉयच्या आगामी 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं कौतुक करत काजलने हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. परंतु यामुळे काजलचे साऊथ इंडियन चाहते मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी काजलला पुन्हा तमिळनाडूत येऊन चित्रपट न करण्याचंही म्हटलं आहे. 

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट ११ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बायोपिकच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुक पूर्ण होईपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय यांनी निर्मिती केली आहे.