वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या एका अभिनेत्यानं स्वत: समलैंगिक असल्याची बाब स्वीकारत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. कल पेन, (कल्पेन मोदी) असं या अभिनेत्याचं नाव असून, त्याच्या जोडीदाराचं नाव जोश आहे. हे दोघंही जवळपास 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, त्यांच्या या नात्यानं आता एक नवा टप्पा गाठला आहे.
कल आणि जोश यांचा साखरपुडा झाला आहे. ज्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. कलच्या कुटुंबीयांनीही या नात्याचा स्वीकार केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याही टीममध्ये त्यांनी काम केलं आहे.
कलनं त्याच्या 'यू कान्ट बी सीरियस' या पुस्तकात जोशचा उल्लेख केला आहे. 11 वर्षांपूर्वी कल आणि जोशची भेट एका बारमध्ये झाली होती. आपल्यालाही समलैंगिकतेबाबची जाणीव फार उशीरा झाल्याचं तो म्हणाला.
कल आणि जोश हे दोघंही वेगळ्या विचारांचे आहेत. जोशला फार प्रसिद्धीझोतात येणं आवडत नाही. आपल्या नात्याला कुटुंबीयांचा पाठिंबा मिळण्याचा कलला आनंद आहे. प्रेमाच्या त्याच्या या प्रवासात आता जोश कायम त्याच्या सोबतच असणार आहे, ही बाब नात्यांची परिभाषा बदलणारी ठरत आहे.
कलचं गुजरात कनेक्शन
कल पेन याच्या वडिलांचं नाव सुरेश मोदी आहे. तो मुळचा वडोदरा असून, तो एक इंजिनियरही आहे. बालपणीच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये कल भारतात आला होता. गुजराती चित्रपटांमध्येही काम करण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या चित्रपटात काम करण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती.