Kamal Haasan Second Wife : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचं खासगी आयुष्य त्यांच्या कामाप्रमाणेच सतत चर्चेत असतं. कमल हासन यांनी 1978 मध्ये वाणी गणपति यांच्याशी लग्न केलं. कमल हासन हे विवाहीत असताना ते सारिका यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आले. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी सतत काहीना काही म्हटले जायचे. कमल हासन यांच्याशी लग्न केल्यानं लोकांना त्यांना कमल हासन आणि वाणी गणपतिमध्ये आलेली दुसरी महिला असं म्हणू लागले. पण या सगळ्याचा त्यांच्या रिलेशनशिपवर काही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सारिका यांच्यासोबत राहण्यासाठी कमल हासन यांनी त्यांचं 10 वर्षाचं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि वाणी यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर त्याच वर्षी कमल हासन यांनी सारिका यांच्याशी लग्न केलं. दरम्यान, काही काळानंतर सारिका आणि कमल हासन यांच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला आणि 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सारिका आणि कमल यांना दोन मुली आहेत. श्रृती हासन आणि अक्षरा हासन अशी त्यांची नावं आहेत.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत सारिका यांनी कमल हासन यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयाविषयी पश्चाताप नाही असं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की 'कितीही वेळा विचारा मी एकच सांगेन की, मला जर पुन्हा एकदा माझं आयुष्य जगण्याची संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा तशीच जगेन जशी मी आता जगले. कारण त्यात मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. आज मी जे काही आहे ते सगळं माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. एकवेळ होता जेव्हा सगळं काही ठीक होतं, हा त्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू खराब झाल्या.'
हेही वाचा : Photo : वडिलांची पहिली बाईक, आठवणी आणि सलमान; पाहा भाईजानची Father-Son Moment
'दुसरी स्त्री' च्या टॅगवर सारिका म्हणाल्या होत्या की 'त्यांना या सगळ्याचा काही फरक पडत नाही. हा फक्त एक विचार होता. त्यात दुसरं काही नाही. लोकांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. माझ्या मनात कोणासाठी काही नाही. हे माझं आयुष्य होतं, मला माहित होतं की मी काय करते. माझ्या आयुष्यात दोन सुंदर मुली आहेत. तुम्ही कसा कोणत्या निर्णयावर पश्चाताप करु शकता. लग्न मोडल्यानंतर कमल हासन किंवा सारिका यांनी पुन्हा लग्न केलं नाही.'
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.