IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मेलबर्न येथील सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 474 धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाची ही आघाडी मोडीत काढताना टीम इंडियाची मात्र दमछाक झाली. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल (82) वगळता इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही, त्यामुळे टीम इंडियावर फॉलो ऑनची तलवार लटकत होती आणि टीम इंडियाचे (Team India) फलंदाज एकामागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये परतत होते. अशावेळी अवघ्या 21 वर्षाच्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध वादळी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.
ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी 474 धावांवर ऑल आउट झाल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी ही धावांची ही आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशस्वी जयस्वालने 82, विराट कोहलीने 36, केएल राहुलने 24, रिषभ पंतने 28, जडेजाने 17, वॉशिंग्टन सुंदरने 40 तर नितीश रेड्डीने 85 धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीने ८३ बॉलमध्ये ५१ धावा करत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 97 व्या ओव्हर पर्यंत त्याने 119 बॉलमध्ये नाबाद 85 धावा केल्या होत्या. नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरच्या तुफानी खेळीमुळे टीम इंडियावरील फॉलो ऑन खेळण्याच संकट देखील दूर झालं.
21 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी हा भारताकडून तिसरा सामना खेळत असून यात त्याने आतापर्यंत जवळपास 179 धावा केल्या आहेत. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलेलं अर्धशतक हे नितीश रेड्डीचे आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक होतं. टीम इंडिया संकटात असताना नितीशने मैदानात जॅम बसवत ठोकलेलं हे अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं. अर्धशतक पूर्ण केल्यावर नितीशने पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनची 'झुकेगा नही साला' ही ऍक्शन केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हेही वाचा : चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित शर्माला कसोटीमधून निवृत्त व्हावं लागणार? अजित आगरकर...
Elon Musk changed the like button fornitishkumarreddy
Carefully a real life Pushpa
Nitish Kumar Reddy INDvsAUS ViratKohli Pushpa2 AlluArjun SquidGame2 MerryChristmas INDvsAUS BGT2024 RohitSharma YashasviJaiswal pic.twitter.com/56Gc12M9UE— RAJASTHANI MAN (rajasthaniman1) December 28, 2024
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप