'लागीरं झालं जी' फेम जीजी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं कर्करोगामुळे निधन झालं आहे. 

Updated: Nov 15, 2020, 06:40 PM IST
'लागीरं झालं जी' फेम जीजी काळाच्या पडद्याआड title=

मुंबई : 'लागीरं झालं जी' मालिकेमध्ये 'जीजी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. कर्करोगासारख्या दिर्घ आजाराला झुंज देत त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरू येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. 

'लागीरं झालं जी' मालिकेतील अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण याने सोशल मीडियावर जीजींसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. 'जीजी अजून खूप त्रास द्यायचा होता गं. मला काय बोल्ली होतीस प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणार आहे आणि तूच माझा नातू... ' असं भावूक कॅप्शन देत त्याने जीजीसोबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

शिवाय आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं, मग का गं इतक्यात सोडून गेलीस? असा प्रश्न देखील अज्यानं त्याच्या जीजीला विचारला आहे. तर कमल ठोके यांच्यावर कराड येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कमल ठोके यांनी 'बाबा लगीन', 'माहेरचा आहेर', 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'बरड', 'आम्ही असू लाडके ' अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.