'मी विद्या बालनसारखं काम करू शकत नाही...' कंगनाने 'डर्टी पिक्चर'ला नकार देण्याचं कारण

अभिनेत्री विद्या बालन स्टारर 'डर्टी पिक्चर' चित्रपटासाठी कंगनाला ऑफर देण्यात आली. 

Updated: May 2, 2021, 07:47 PM IST
'मी विद्या बालनसारखं काम करू शकत नाही...' कंगनाने 'डर्टी पिक्चर'ला नकार देण्याचं कारण

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीतील आहे. एका मुलाखतीत कंगनाने एक मोठा खुलासा केला. अभिनेत्री विद्या बालन स्टारर 'डर्टी पिक्चर' चित्रपटासाठी कंगनाला ऑफर देण्यात आली. पण त्यावेळी तिने ऑफर नाकारली. पण मुलाखतीत विद्याने चित्रपटात उत्तम काम केलं असल्याचं देखील कंगना म्हणाली. शिवाय ज्या प्रकारे विद्याने भूमिकेला न्याय दिलं, ते मी देवू शकले नसते. असं देखील कंगना म्हणाली. 

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कंगना रानौतला विचारलं गेलं की, कोणताही चित्रपट न करण्यामागे कारण काय? तेव्हा कंगना म्हणाली, 'नाही.. असं काही.. मी 'डर्टी पिक्चर' करण्यास नकार दिला होता. पण चित्रपट हिट ठरला. किंबहुना ज्या प्रकारे विद्याने भूमिकेला न्याय दिलं, ते मी देवू शकले नसते.'

कंगना पुढे म्हणाली, 'मी कधीही राजकुमार हिरीनी, संजल लिला भंसाळी, धर्मा प्रॉडक्शनसोबत काम केलं नाही.  यश राज  फिल्म नाही, तर  कोणता खान.. मी कोणासोबत काम केलं नाही.  तरी देखील मी अव्वल अभिनेत्रींच्या यादीत आहे. मी माझ्या स्वतःच्या वर्चस्वावार ही जागा मिळवली आहे. त्यामुळे 'डर्डी पिक्चर'ची  ऑफर नाकारल्यामुळे मला काही वाटत नाही. 

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती, 'थलायवी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर 'थलायवी' चित्रपट आधारित आहे. चित्रपट 23 एप्रिल रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाच्य प्रदर्शनाची तारीख पुढे केली आहे.