Sex सीनच्या वेळी कंगनाला वेदना, नेमकं काय बिनसलं?

रक्त वाहू लागलेलं ... 

Updated: Jan 7, 2022, 05:52 PM IST
Sex सीनच्या वेळी कंगनाला वेदना, नेमकं काय बिनसलं? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपटाच्या निमित्तानं एखादा इंटिमेट अथवा Sex सीन साकारणं कलाकारांसाठीही आव्हानाची बाब असते. या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी असाच एक प्रसंग घडला होता, जेव्हा अभिनेत्री कंगना रानौत हिला वेदनांचा सामना करावा लागला होता. (Kangana Ranaut)

जॉन अब्राहम आणि कंगनावर या दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. 'शूटआऊट अॅट वडाला' या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

जॉन या चित्रपटातील दृश्याच्या चित्रीकरणावेळी त्याच्या पात्रामध्ये इतका एकरुप झाला, की त्याच्या आवेगाला आवरणं कठीण झालं. 

जिथं जॉनला आवेग आणि प्रेम अशा दोन्ही भावना साकारायच्या होत्या तेव्हा त्याच्या आवेगानं प्रेमाची भावना मागे टाकली. 

 'ये जुनून' या गाण्याच्या वेळी तो इतका समरस झाला, की कंगनाला यामुळं दुखापत झाली. 

किसिंग सीनला ओके टेक मिळाल्यानंतर पुढे बेडवरील सीनच्या वेळी जॉनला कंगनाचे हात पकडायचे होते. त्यावेळी तिच्या हातात बांगड्या होत्या. 

सूत्रांच्या माहितीनुसार जॉन या इंटेंस लव्हमेकिंग सीनमध्ये इतका एकरुप झाला की, कंगनाची बांगडी तुटून तिच्या हातात रुतली आणि रक्त वाहू लागलं. 

आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं लक्षात येताच जॉननं तातडीनं तिची माफी मागितली. कंगनानंही या गोष्टीला फार महत्त्वं न देता पुढील चित्रीकरण पूर्ण केलं.