Kangana Ranaut Defended Slapping: लोकसभा निवडणुकीमध्ये मंडी येथून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आलेली अभिनेत्री कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर सीआयएसफच्या महिला कर्मचाऱ्याकडून कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला. गुरुवारी घडलेला हा प्रकार सध्या चर्चेत आहे. सीआयएसएफची महिला जवान कुलविंदर कौरने कंगनाला कानशीलात लगावली. आपली आई शेतकरी आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरलेली असताना कंगणाने या बाया 100 रुपयांसाठी आंदोलन करतात असं वक्तव्य केलं होतं. त्याच रागातून आपण हात उचलल्याचं ही महिला कर्मचारी म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र आता या प्रकरणानंतर कंगनाने पोस्ट केलेल्या एका जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीन शॉटमध्ये कंगनाने 2022 च्या ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने ख्रिस रॉक्सच्या कानशिलात लगावण्याच्या कृतीचं समर्थन केलं होतं.
कंगनाने विल स्मीथ ख्रिस रॉक्सला कानशीलात लगावताना स्क्रीन शॉट पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करताना कंगणाने, 'कोणी माझ्या आई किंवा बहिणीच्या आजारावरुन वेड्या लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला विल स्मिथप्रमाणेच कानाशीलात लगावेल,' अशी कॅप्शन दिली होती. तिने या फोटोवर प्रतिक्रिया देताना टाळ्या वाजवण्याचे इमोजीही शेअर केले होते. 'बॅड** मूव्ह... अपेक्षा आहे की तो माझ्या लॉकअप (कार्यक्रमात) येईल,' असंही कंगनाने म्हटलं होतं. आईवरुन बोलल्याने महिला जवानाने कानशीलात लागवल्याचा दावा केलेला असतानाच दुसरीकडे कंगनाने आपल्या आईबद्दल आजारावरुन कोणी बोललं असतं तर आपणही कानशीलात लगावली असती असा दावा करणारा स्क्रीन शॉर्ट व्हायरल झाला आहे. कंगनाच्या या जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीन शॉर्ट आता या कानशीलात प्रकारानंतर व्हायरल होताना दिसत आहे.
1)
Image 1 : Kangana on kulwinder kaur Slap
Image 2 : Kangana Ranaut on Will Smith Slap
Hypocrisy Queen for a Reason. pic.twitter.com/GrVnhZavS8
— Ductar Fakir 2.0 (@Chacha_huu) June 8, 2024
2)
As per Kangana Ranaut Will Smith can hit someone for making a joke on his wife but another woman can’t hit her for calling her mother “100rs m baithne wali” & asking to behead her farmer father ?? Hypocrisy ki seema guyss https://t.co/YmvsKCATfS pic.twitter.com/HWrsGQqS0t
— m (@luco_zain) June 8, 2024
विल स्मित आणि ख्रिस रॉक्समध्ये 94 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये स्टेजवरच राडा झाला होता. विल स्मिथने स्टेजवर येऊन कॉमेडियन ख्रिस रॉक्सच्या कानशिलात लगावली होती. विल स्मिथच्या पत्नीने म्हणजेच जेडाने डोक्यावरील केस काढल्याचा विनोद ख्रिसने केल्यानंतर विल स्मिथने त्याला स्टेजवर जाऊन मारलं होतं. मात्र वैद्यकीय आजारासंदर्भातील समस्येमुळे जेडाने दोन वर्षांपूर्वीच केस काढले असून ती 2021 पासून अशीच राहत होती. त्यामुळेच स्मिथला राग आला आणि त्याने ख्रिसच्या कानाखाली लगावली. ऑस्कर्सच्या आयोजकांनी या प्रकरणावरुन विल स्मिथवर 10 वर्षांची बंदी घातली आहे. त्याला 2032 च्या ऑस्कर्सपर्यंत या सोहळ्यात प्रवेश मिळणार नाही.