Gashmeer Mahajani Birthday Special : छोट्या पडद्यावरील इमली या मालिकेत त्यांच्या कधी गोड कधी आंबट अशा अंदाजानं सगळ्यांना अभिनेता गश्मीर महाजनीनं वेड लावलं. खरंतर गश्मीरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. 8 जून 1975 रोजी महाराष्ट्रच्या पुणे भागात गश्मीरचा जन्म झाला. गश्मीर हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. त्यामुळे लहान वयातच गश्मीरला अभिनयाचे धडे मिळाले. त्याचा परिणाम हा त्याच्या अभिनयावर सगळ्यांच दिसून येतो. फक्त मालिका नाही तर गश्मीरनं चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
गश्मीरचं शिक्षण हे अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूलमधून झालं. त्यानंतर त्यानं बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. गश्मीरची एक बहीण असून ती त्याच्याहून 13 वर्षांनी मोठी आहे. जेव्हा गश्मीर हा 15 वर्षांचा होता तेव्हा त्यानं स्वत: चा एक डान्स स्टुडियो सुरु केला होता. त्यावेळी गश्मीरचं कुटुंब हे आर्थिक संकाटाचा सामना करत होतं. तेव्हा गश्मीरनं डान्स स्टूडियो सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
गश्मीरच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्याला महाराष्ट्रात ओळख ही कॅरी ऑन मराठामधून मिळाली होती. त्यानंतर पी सोम शेखर यांच्या मुस्कुराके देख जरा या चित्रपटात तो दिसला. त्याच्याशिवाय त्यानं 'पानीपत' या चित्रपटात देखील दिसला होता. गश्मीर हा फक्त चांगला अभिनेता नाही तर एक चांगला डान्सर आणि थिएटर डायरेक्टर आहे. सध्या गश्मीर हा खतरो खिलाडीच्या 14 व्या सीझनमध्ये आहे.
हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
गश्मीर महाजनीच्या रिल लाइफमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं असलं आणि रोमान्स केला असला तरी देखील गश्मीरला खऱ्या आयुष्यात दुसऱ्याच कोणी क्लिन बोल्ड केलं होतं. खरंतर रियल लाइफमध्ये जिच्या प्रेमात गश्मीर हा वेडा झाला होता तिचं नाव गौर देशमुख आहे. गौरी देशमुख आणि गश्मीर महाजनी यांनी 2014 मध्ये लग्न केलं. तर 2019 मध्ये त्यांचा मुलगा व्योमचा जन्म झाला. गौरी ही मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री होती. गौरी ही 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक कुतुब तीन मीनार'मध्ये दिसली होती.