कंगनाचा पुन्हा पंगा! फोटो शेअर करून महाराष्ट्रातील लॉकडाऊनची उडवली खिल्ली

या फोटोतून कंगनाने महाराष्ट्रातील लॉकडाऊनची नेमकी स्थिती काय?

Updated: Apr 16, 2021, 05:19 PM IST
कंगनाचा पुन्हा पंगा! फोटो शेअर करून महाराष्ट्रातील लॉकडाऊनची उडवली खिल्ली

मुंबई : कंगना रानौत (Kangana Ranaut on Maharashtra Lockdown) ने महाराष्ट्रात करण्यात आलेल्या लॉकडाऊनची खिल्ली उडवली आहे. एक फोटो शेअर करत तिने महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेल्या लॉकडाऊनची मस्करी केली आहे. शेअर केलेल्या या फोटोतून कंगनाने महाराष्ट्रातील लॉकडाऊनची नेमकी स्थिती काय आहे हे मांडल आहे. लॉकडाऊनचा नेमका अर्थ काय हे सांगितलं आहे. 

आपण सगळे पाहत आहोत की, Covid-19 शी संपूर्ण जग झगडत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत देशातील काही भागात संचारबंदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कोरोनाचं संक्रमण वाढलं आहे. हे रोखण्यासाठी 15 दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

कंगनाने फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दरवाजावर टाळं लावण्यात आलं. मात्र चारही बाजूंनी मोकळं आहे. एकही भींत नाही. या फोटोची तुलना महाराष्ट्रातील लॉकडाऊनसोबत होत आहे. चाहते देखील कंगनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया येत आहेत.

महाराष्ट्रात 14 एप्रिलपासून रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जो 1 मेपर्यंत  सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यात 144 कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. या दरम्यान दुकाने बंद असणार, बाजार देखील बंद असणार आहे.