सरदार पटेल जयंती दिनी कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

Updated: Oct 31, 2020, 10:16 AM IST
सरदार पटेल जयंती दिनी कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

नवी दिल्ली : कंगना सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहत आहे. आपल्या अपरिपक्व विधानांमुळे ती जनतेचा रोष ओढवून घेताना दिसतेय. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी तिने असे विधान केलंय ज्यामुळे पुन्हा टीकेची धनी झालीय. सरदार वल्लभ भाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना तिने महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केलीय. 

भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांची त्यांच्या जयंतीनिमित्त आठवण काढते. तुम्ही अशी व्यक्ती होतात ज्यांनी आम्हाला आजचा भारत दिला. पण तुम्ही पंतप्रधान पदाचा त्याग करुन महान नेतृत्व आणि दूरदर्शितेला आमच्यापासून दूर केलं. तुमच्या या निर्णयाची आम्हाला खंत आहे असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले.

सरदार पटेल योग्य पंतप्रधान 

गांधींना खुश करण्यासाठी भारताच्या पहील्या पंतप्रधान पदाच्या रुपात तुम्ही योग्य आणि निर्वाचित पदाचे बलिदान दिले. गांधींना वाटायचं की नेहरु खूप चांगल इंग्रजी बोलतात. यामुळे सरदार पटेल यांनाच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले. आपला हक्क असलेली गोष्ट आपण निर्लज्जपणे खेचून घ्यायला हवी, तो आपला हक्क असल्याचे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलंय.

महात्मा गांधीवर विधान 

गांधीजींना नेहरुंसारखा एक कमकुवत डोक्याचा माणूस हवा होता. ज्यांना ते नियंत्रणात ठेऊ शकतील आणि सर्व निर्णय स्वत: घेऊ शकतील. हा एक चांगला प्लान होता. पण गांधींना मारलं गेल्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. असंही तिने ट्वीटमध्ये म्हटलंय. 

लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची आज १४५ वी जयंती आहे. संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते.