Kangana Ranat ने पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, अक्षय करायचा लपून फोन

कंगनाचा खूप मोठा खुलासा 

Updated: Apr 8, 2021, 11:51 AM IST
Kangana Ranat ने पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, अक्षय करायचा लपून फोन

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगना रानौत आणि तिचे वाद कायमच चर्चेचा विषय झाला आहे. ती अनेक मुद्यांवर आपलं अतिशय स्पष्ट मत मांडत असते. हल्लीच कंगनाने सोशल मीडियावर मोठा खुलासा केला आहे. कंगनाने केलेल्या या खुलासामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कंगनाने मुव्ही माफियांवर निशाणा साधला आहे. अक्षय कुमार सारखे मोठे कलाकार मला सिक्रेटली फोन करत असल्याचा खुलासा केला आहे. 

अक्षय सारखे कलाकार फोनवर करतात माझं कौतुक 

अनिरूद्धच्या या ट्विटवर कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाने लिहिलं आहे की,'बॉलिवूडमध्ये एवढी शत्रूता आहे की लोकांना कौतुक करण्यासही अडथळा निर्माण होतात. मला अनेक सिक्रेट कॉल आणि मॅसेज आले होते. अक्षय कुमार सारखे अनेक मोठे कलाकार मला फोन करायचे. थलायवा सिनेमाचं सगळीकडून कौतुक झालं मात्र आलिया आणि दीपिकाच्या सिनेमांप्रमाणे या सिनेमाचं मोकळेपणाने कौतुक झालं नाही.'

कंगनाने मूव्ही माफियांना दिलं उत्तर

कंगनाने हा खुलासा स्क्रीन रायटर अनिरुद्ध गुहाच्या ट्विटनंतर केला. अनिरूद्धने कंगनाला घेऊन एक ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कंगनाचं खूप कौतुक केलं होतं. अनिरूद्धने एका युझरला उत्तर देताना हे लिहिलं होतं. कंगना रानौत एक असाधारण, पिढीत एकदा होणारी अभिनेत्री आहे.

लोकं मला ठरवून टार्गेट करतात 

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये ती म्हणते,'जर कलेशी जोडलेली इंडस्ट्री ऑब्जेक्टिव राहू शकली असती आणि पावर आणि राजकारणात फक्त सिनेमासाठी सहभागी झाली असती. माझं राजकीय मत आणि आध्यात्माची मत बुली करून मला टार्गेट केलं जातं. पण असं झालं तर मीच जिंकते'