कंगना झाली कंगाल; टॅक्स भरण्यासाठी देखील नाही पैसे

 नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक संकटात सापडल्याची कबुली दिली.

Updated: Jun 11, 2021, 11:53 AM IST
कंगना झाली कंगाल; टॅक्स भरण्यासाठी देखील नाही पैसे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत कायम वादग्रस्त वक्तव्य करत वादाच्या भोवऱ्यात अडकते. ट्विटरने सस्पेंड केल्यानंतर तिने इन्स्टाग्रामच्या  माध्यमातून आपले विचार चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. पण आता कंगनावर आर्थिक संकट कोसळलं आहे. कंगनाकडे टॅक्स भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. खुद्द कंगनाने माझ्याकडे पैसे नसल्याची कबुली दिली आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक संकटात सापडल्याची कबुली दिली.

इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत कंगना म्हणाली, 'भारतात सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत मी देखील आहे. मी माझ्या कमाईमधील 45 टक्के टॅक्स भरते. सर्वात जास्त टॅक्स भरत असली तरी काम नसल्यामुळे मी गेल्या वर्षीचा अर्धा टॅक्स भरू शकली नाही. माझ्या जीवनात पहिल्यांदा टॅक्स भरण्यास उशिर झाला आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे कंगना म्हणाली, 'सरकार माझ्या थकित करावर व्याज जोडत आहे. मात्र मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करते. सध्याचा काळ सर्वांसाठीच कठीण आहे, मात्र आपण सर्वजण एकत्र अशा काळावर मात करुया.'  असं म्हणतं कंगनाने सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं  आहे. 

दरम्यान, फक्त देशातचं नाही, तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या महामारीमुळे बॉलिवूडला देखील मोठा फटका बसला आहे.