मुंबई : आताची जीवनपद्धती पूर्ण बदलली आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाच्या डोक्यावर तणावाचं मुकूट असतं. मात्र चेहऱ्यावर हसू, परिणामी सामना करावा लागतो तो म्हणजे नैराश्याचा. यात कलाकार देखील मागे नाहीत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. तिच्या या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रानौतने प्रतिक्रिया दिली आहे. पारंपारिक कुटुंब व्यवस्था खूप महत्वाची असल्याचं मत तिने व्यक्त केलं.
काय म्हणाली कंगना
'वयाच्या १६व्या वर्षापासून मला शारीरिक अत्याचाराचा सामना करावा लागला. त्यात बहिण ऍसिड पीडित असल्यामुळे तिची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी माझी होती. नैराश्याचे अनेक कारणं असू शकातात. परंतु विभक्त कुटुंबाचा मुलांवर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचं सांगत तिने पारंपारिक कुटुंब व्यवस्था खूप महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलं.
At 16 I was facing physical assault, was single handedly taking care of my sister who was burnt with acid and also facing media wrath, there can be many reasons for depression but it’s generally difficult for broken families children, traditional family system is very important. https://t.co/0paMh8gTsv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
दरम्यान आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं वक्तव्य इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत केलं. 'मी गेल्या चार वर्षांपासून नैराश्याचा समाना करत आहे. त्यासाठी मी अनेक डॉक्टरांकडेही गेले. मी क्लिनिकली डिप्रेस्ड आहे. पण, आता मी अगदी व्यवस्थित आहे.'
इराचा हा व्हिडिओ समोर येताच इतक्या गंभीर मुद्द्यावर तिच्या खुलेपणानं बोलण्याची अनेकांनीच दाद दिली. व्हिडिओ पोस्ट करतही तिनं एक सुरेख असा संदेश दिला. आयुष्याकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन नेमका कसा असावा हे तिनं या कॅप्शनमधून सांगितलं.