कंगनाचा 'ड्रीम बॉय' नक्की आहे तरी कोण? फोटो शेअर करत म्हणाली...

कंगनाच्या आयुष्यात  'ड्रिम बॉय'ची एन्ट्री, तो नक्की आहे तरी कोण?   

Updated: Nov 29, 2021, 03:15 PM IST
कंगनाचा 'ड्रीम बॉय' नक्की आहे तरी कोण? फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगना तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत आहे कंगना ने लिहिलं, 'तेरे लिए हम है जिए.... कितने सितम हमपे सनम...'   पण कंगनाने तिच्या आयुष्यातील ड्रीम बॉयबद्दल काही सांगितलेलं नाही.

कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये कंगनाने पोस्ट का शेअर केली असावी? अशी चर्चा रंगत आहे की,  ही पोस्ट पाहिल्यानंतर प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की कंगनाची प्रेमात फसवणूक झाली आहे की ती कोणाच्यातरी आठवणीत आहे.

'तेरे लिए हम है जिए....' गाणं 2004 साली प्रदर्शित झालेल्या अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटाच्या सिनेमातील आहे. या गाण्याचे बोल  ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचे आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होत असतो. अशा परिस्थितीत कंगनाची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.