Alia Bhatt रुग्णालयात दाखल; चाहते आणि कुटुंब गोड बातमीच्या प्रतीक्षेत? पाहा फोटो

भट्ट आणि कपूर कुटुंबात लवकरच येणार नवीन पाहुणा? आलिया भट्ट रुग्णालयात दाखल  

Updated: Nov 6, 2022, 10:37 AM IST
Alia Bhatt रुग्णालयात दाखल; चाहते आणि कुटुंब गोड बातमीच्या प्रतीक्षेत? पाहा फोटो title=

Alia Bhatt pregnancy : राझी,  गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), डार्लिंग्ज (Darlings) आणि ब्रह्मास्त्र (Brahmastra) यांसारख्या पाठोपाठ यशानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आता आईची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. आलियाला रविवारी सकाळी 7.30 वाजता Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आलियासोबत अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील आहे. आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते 'गोड बातमी'च्या प्रतीक्षेत आहेत. 

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना दिली 'गुडन्यूज' 
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलिया भट्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. सोनोग्राफी दरम्यानचा फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता. शिवाय मॉनिटरवर एक हार्ट इमोजी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (Alia bhatt goodnews)