कपिल शर्माने वाढवलं मानधन; एका एपिसोडसाठी घेणार एवढे कोटी

 कपिलचे चाहते देखील शोच्या प्रतीक्षेत आहेत

Updated: Jun 29, 2021, 12:05 PM IST
कपिल शर्माने वाढवलं मानधन; एका एपिसोडसाठी घेणार एवढे कोटी  title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरचं द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कपिलचे चाहते देखील शोच्या प्रतीक्षेत आहेत. सांगायचं झालं तर कोरोनामुळे शो बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. पण दुसऱ्यांदा शो बंद ठेवण्याचं कारण म्हणजे कपिल दुसऱ्यांदा बाबा होणार होता.  आता कपिल पुन्हा एकदा जबरदस्त एन्ट्री करत प्रक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. शो लवकरचं पुन्हा ऑन एअर होणार आहे. 

आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणूस जणू हसू विसरूनच गेला आहे. त्यामुळे आनंद शोधण्यासाठी कपिलचा शो एकमात्र उपाय. आता कपिल पुन्ह नव्या अंदाजात चाहत्यांना पोट धरून हासण्यास भाग पाडणार आहे. पण आता प्रेक्षकांना हासवण्यासाठी कपिलने मानधन वाढवलं आहे. आता एका एपिसोडसाठी कपिल तब्बल कोटी रूपये घेणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार शो होस्ट करण्यासाठी कपिल पूर्वी एका एपिसोडसाठी 30 लाख रूपये घेत होता. त्यानंतर कपिलने त्यांची फी 50 लाख रूपये केली. आता कपिल एका एपिसोडसाठी 1 कोटी रूपये घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

द कपिल शर्मा पुन्हा कधी चाहत्यांच्या भेटीस येईन याबद्दल अधिकृत माहिती कळालेली नाही. पण शोचं चित्रीकरण जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.