सुनील ग्रोवरला हार्ट अटॅक, कपिल शर्माला धक्का

कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. 

Updated: Feb 5, 2022, 07:57 PM IST
सुनील ग्रोवरला हार्ट अटॅक, कपिल शर्माला धक्का title=

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून हृदयविकारामुळे सुनीलला मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांचा आवडता अभिनेता आता रुग्णालयातून घरी आला आहे. सुनीलचा जुना मित्र आणि सहकारी कपिल शर्माला ही सुनीलचीखूप काळजी आहे.

त्याने सुनीलच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी त्याला मेसेजही केला. कपिल आणि सुनीलने अनेक वर्षे द कपिल शर्मा शोमध्ये एकत्र काम केले आहे.

सलमान पाठोपाठ आता  कॉमेडियन कपिल शर्माने ही सुनीलच्या तब्येतम्हणण्यानुसार, सुनीलच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाल्याचं ऐकून त्याला धक्काच बसला.

कपिल म्हणतो, 'सुनीलच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकून मला पूर्ण धक्का बसला आहे, मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटत आहे. मी त्याला मेसेजही केला होता, मात्र त्याला कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.